पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिस व तेथील ऐषआराम. व आश्चर्यही वाटलें. आम्ही तेथे गेलो त्या वेळी दुतर्फा वृक्षराजीतील वृक्षांना नवपल्लव फुटून ते बहारदार दिसत होते. यामुळे आमांला या राजपथांचे त्यांच्या अत्युत्तम स्थितीत दर्शन घडले. जातिनिबंधांमुळे हिंदू लोकांना आपले खानपान इतरांसमक्ष व अगदी उघड्यांत करता येत नाही. अशांना इकडील लोकांचे उघड्यांत मोकळेपणी उपाहार घेणे प्रथम प्रथम कसेसेंच वाटते. तरी लौकरच या उघड्या उपाहारगृहांच्या देखाव्याची संवय पडून, त्याचे काही विशेष वाटेनासें होतें. तेथे जाणारे लोक, आपापली काफी किंवा मये यांचा हळू हळू आस्वाद घेत, येणाऱ्या जाणाऱ्या मंडळीची गंमत स्वस्थपणे पाहात राहतात. सहल करण्याला आलेले लोक संथपणे फिरत, तेथें ऐकू येणारे गायनवादनाचे सूर आनंदाने ऐकत राहतात. बहुतेक साऱ्या प्रतिष्ठित उपाहारगृहांमध्ये 'आर्चेस्ट्राची'-गायनवादनाची-व्यवस्था केलेली असते.बहुतेक मोठ्या शहरांमध्ये अनेक बाबतींत साम्य असते. सकाळच्या प्रहरी उद्योगी कामकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी, लगबगीने कामावर जात असतात. सायंकाळी त्यांचे थवेच्या थवे फुरसतीने व खुशाल चैन करितात. त्याच्यांत आम्हांला नवीन असे काही दिसले नाही. युरोपियन लोकसमाजाच्या प्रत्येक केंद्रामध्ये हा भरतीओहोटीसारखा प्रकार नित्य व साहजिक चालू असलेला आढळतो.