पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग पांचवा. पारिस व तेथील ऐषआराम. 'भव्य थाटदार व आनंदी मंडळीचे मायवर' असे पारिस शहराचे वर्णन करितात. खरोखरच तेथे पाहावे तिकडे सुखोपभोगेच्छा व चैन यांना सारखा ऊत आलेला दिसत असतो. फ्रेंच लोक निसर्गतःच मोकळ्या मनाचे व त्यांचे अंतःकरण सदा उल्हसित असते, या गोष्टी तेथे पोहोंचलेल्या प्रत्येक परकी प्रवाशाच्या मनांत तेव्हांच बिंबतात. तेथें सांसारिक उपाधींसंबंधी खोल विचारांत गढलेले असे कोणीच दिसून येत नाहीत. जो तो आनंदांत व खुशालीत. मग्न. या सेन नदीतीरावर वसलेल्या अजब शहरांत प्रत्येकाचे मन, होईल तसे व तेथवर चैनीत व सुखाने कालक्रमण कसे करावे, याविषयींच वेधलेले दिसते. ललित कलांची आवड व तद्विषयक उपजत बुद्धि, आणि सृष्ट किंवा कृत्रिम पदार्थमात्रांमधील सौंदर्य यांविषयी प्रेम, या लोकांमध्ये पदोपदी दृष्टोत्पत्तीस येते. तेथील प्रशस्त व विस्तृत राजपथांची (बूलेव्हार्डस) सारखी व अप्रतिम व्यवस्था पाहून मला भारी आनंद झाला,