पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुप्रसिद्ध, थोर व प्रतापशाली नेपोलियन याची मातृभूमि. धैर्यशाली नरव्याघ्राच्या मनाला दीनपणे शत्रूला शरण जाण्याची कल्पना शिवली सुद्धा नाही. हातीं तरवार धरून लढता लढतां तो श्रीरंगपट्टणच्या वेशीत ठार झाला. वीर्य व शौर्य यांचे खरे अप्रतिम हिंदी प्रतिनिधि-इकडील रजपूत लोक-नेपोलियनच्या शरण जाण्याकडे तिरस्कारदृष्टीनेच पाहाते. या कृतीने नेपोलियनने आपल्या काही शिपायांचे प्राण वाचविले, हे खरें. 'पण किती तरी निकराच्या लढायांत आपल्या फौजा, आगीचा प्रळयकारक वर्षाव करणाऱ्या शत्रूच्या विध्वंसक तोफखान्यावर बेधडक नेण्याला ज्याचे मन केव्हाही कचरलें नाही, त्याला या थोड्याशा लोकांची कीव यावी, हे तरी विलक्षणच ! साऱ्या युरोपाला दहशत पाडणाऱ्या नेपोलियनचा अखेर पाडाव करणारा भाग्यशाली इंग्रज जनरल-डयूक ऑफ वेलिंगटन-याला लष्करी व्यवस्था व सेनानिवेशविषयक पहिला धडा हिंदुस्थानांतील समरभूमीवरच मिळाला होता. कारण, त्याने बऱ्याचशा लढाया मारल्या, त्या मराठ्यांबरोबरच्या युद्धांमध्ये, ही मजेदार गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे.