पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. राजमंडळ आणि निजामाचे दरबार यांच्यामध्ये नाना फडणीस व तत्सम इतर राजकार्यधुरंधर प्रमुख मंडळीचे नेतृत्व कमी होतांच, टिपूच्या राजकारणांत पहिले तटस्थ राहिले व दुसऱ्याने त्याच्या पाडावाला जोराने मदत कली. त्यानंतर तीन वर्षांतच मराठेशाहीच्या स्वातंत्र्याला जबरदस्त ठोकर बसली व दोन दशकांच्या आंतच ती सफा बुडाली. त्यांतल्या त्यांत त्याचा एक चांगला म्हणावयाजोगा परिणाम झाला तो हा की, पुष्कळशी लहान लहान संस्थाने वांचली गेली. क्षत्रियांच्या खऱ्या ध्येयांचे शिक्षण मिळालेल्या हिंदु लोकांच्या मनाला नेपोलियनचे शरण जाणे पसंत पडत नाही.त्याच्यासारख्या वैभवशाली पण दुःखपर्यवसायी आयुष्यक्रमाला धारातीर्थीच मरण पावणे अधिक श्रेयस्कर झाले असते.त्याचा पूर्वीच इतका कांहीं नाश होऊन चुकला होता की, त्या स्थितीत व तशा कष्टदायक व अपमानकारक रीतीनें वांचविले जाण्याइतकी त्या प्राणांची किंमतच राहिली नव्हती. त्याचा समकालीन व साहाय्यकर्ता दोस्त ह्मणून मानला गेलेला म्हैसूरचा टिपू सुलतान याचा अंत त्याच्या अगदी उलट उदाहरण ह्मणून दाखवितां येण्याजोगे आहे. त्याने आपल्या एकनिष्ठ सेवकजनांसह धारातीर्थी देह अर्पण केला त्यापूर्वी पुष्कळ दिवस, आपला सर्वस्वी नाश झाला, ही गोष्ट त्याला कळून चुकली होती. इंग्रजांच्या हातून त्याची व्यवस्था नेपोलियनापेक्षा पुष्कळच चांगली राखली जाण्याचा संभव होता. पण त्या કર