पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुप्रसिद्ध, थोर व प्रतापशाली नेपोलियन याची मातृभूमि. ण्याचा यत्न केला, त्यामुळे सारे यूरोप खळबळून जाऊन इंग्लंडाला ते आयतेंच उत्सुक व तत्पर साहाय्यकारी झाले. त्यांनी राष्ट्रीय सत्तेच्या समतोलपणाची तुला पूर्ववत् करून अखेर आपलें सामर्थ्य कायम राखले, आणि नेपोलियन व त्याच्यावरच अवलंबून असलेले सर्व काही एकदम रसातळी गेले. लॉर्ड कॉर्नवालिस साहेबाच्या वेळी, हिंदुस्थानांतील निरनिराळ्या राज्यकर्त्यांच्या सामर्थ्याच्या समतोलपणाविषयींची त्याची कल्पना, तत्कालीन हिंदी राज्यकांनी उमजून अमलांत आणली असती तर, हिंदुस्थानाच्या इतिहासाला कसे वळण लागले असते याची कल्पना मनांत येऊन आश्चर्य वाटल्यावांचून राहात नाही. समकालीन युरोपियन लोकांच्या अंगचे राजकार्यकौशल्य, राजकीय धोरण व दूरदृष्टि, यांच्या अभावामुळे त्यांना अशा. राजनतिांचे मर्म लक्षात आणता आले नाही, किंवा ती अमलांत आणली गेली नाही, हे मर्म लक्षात ठेवून त्यांनी राजकारणाचे धोरण ठेविले असते, तर ब्रिटिश लोकांना आपला क्रम तितका सोपा सांपडता ना.फ्रेंच लोकांचे प्राबल्य हिंदुस्थानांत कायम न होण्याला जी बरीचशी महत्त्वाची कारणे झाली, त्यांतच त्यांच्या वेळी देशी राज्यकर्ते, या आपापसांत झगडणाऱ्या परकीय लोकांच्यापेक्षां, एकमेकांला मदत करण्याला जास्त तयार होते, हेही एक प्रबल कारण होते. पण महाराष्ट्र