पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. स्वतःचें नांव एका रिपब्लिकन क्लबाच्या पटांत सिटिझन टिपू ह्मणून सुद्धा दाखल केले होते; पण त्याचे हाडवैरी जे इंग्रज लोक, त्यांनी त्याच्या पूर्वीच डाव साधला. टिपूचा नाश आणि खुद्द नेपोलियनला एकर येथे बसलेली जबर ठोकर, यांमुळे त्याच्या तिकडील महत्त्वाकांक्षा व उमेदी यांच्या एकाएकी चिंधड्या उडाल्या. नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर इंग्रज पुनः सारा हिंदुस्थान देश आक्रमण करण्याच्या हक्कशीर व विधिनिर्मित क्रमाला लागण्याला मोकळे झाले. फ्रान्स देश पहिल्या प्रतीचे प्रबळ राष्ट्र बनविल्यानंतर, जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था व दृढीकरण यांच्याकडे नेपोलियन लक्ष देता व तें पुरतें साध्य झाल्यावरच अधिक विजयप्राप्तीचा उपक्रम करिता, तर काय झाले असते, याविषयी कल्पना करणे बरेंच मनोरंजक आहे. कोणच्याही कामाचा पुरता पिच्छा पुरविण्याची शक्ति, अतुल राजकार्यकौशल्य, नैसर्गिक युद्धनैपुण्य, पक्कें व अचल धैर्य, आणि अप्रतिम चिकाटी, हे गुण अंगी असल्यामुळे, त्यांच्या योग्य उपयोगाने या नृसिंहाने किती तरी गोष्टी साध्य केल्या असत्या ! पण अतिरेक झालेल्या महत्त्वाकांक्षेच्या पायीं राष्ट्रीय सत्तेच्या समतोलपणाच्या तत्त्वासंबंधानें तो अंध होऊन गेला. हे तत्त्व त्याच्या शत्रंच्या पूर्णपणे लक्षांत वागत होते, व त्याचा त्यांनी पुरता फायदा घेतला. त्याने सकल वस्तुमात्र फ्रेंच कर