पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुप्रसिद्ध, थोर व प्रतापशाली नेपोलियन याची मातृभूमि. बद्दलचे विचार माझ्या मनांत आले. युरोपांतील सर्व देशांत फ्रान्स हे पहिल्या प्रतीचे राष्ट्र बनवून कान्सल म्हणून अशा राष्ट्राचे धुरीणत्व आमरण स्वतःच्या हातांत राहावें हे त्याला पुरेसें न वाटतां, त्या राष्ट्राचा आपण बादशहा झालों पाहिजे अशी त्याला महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली होती. तीही पुरी होऊन त्याचे समाधान झाले नाही. स्वतःचा राजवंश कायम करावा ही त्याची इच्छा. तिच्या पायीं आस्ट्रियाच्या बादशाही घराण्याला नाक घांसावयाला लावून त्याची एक राजकन्या, आपली द्वितीय पत्नी होण्यासाठी अर्पण करण्याला त्याने भाग पाडले. सारे यूरोप तृणप्राय समजल्यामुळे अर्थातच सर्व युरोपाने एकत्र होऊन त्याच्यावर हल्ला करण्याला जणों त्याने भाग पाडले. आपल्या अप्रतिहत व अवाढव्य सत्तेनेच तो तृप्त झाला नाही. त्याने आपल्या भावांना राजे व सेनापति केलें. परंतु या सर्वांचा मूलाधार जो नेपोलियन त्याच्या पदच्युतीबरोबर त्यांचे अधिकार लयाला जाणे निर्विवाद होतें. त्याच्या विचित्र व अलौकिक कर्तृत्वशक्तीला सारे यूरोपदेखील पुरे झाले नाही. प्राच्य देशांतही एक प्रचंड व वैभव-- शाली साम्राज्य स्थापन करण्याचा त्याचा बेत होता. त्याच्यासाठी त्याने जीवापाड झटून यत्न केला. मैसूरचा सुलतान टिप याच्याशी कारस्थान चालवून, ब्रिटिश लोकांचे पाऊल पढें वाढू नये असा त्याने प्रयत्न केला. त्या जुलमी सुल्तानाने.