पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वस्तूंचा शोध लावण्यांत व त्या खरेदी करून त्या थोर बोनापार्टाच्या वेळच्याप्रमाणे लावून सजवून ठेवण्यांत सुमारे पाऊण कोट रुपये खर्च केले. फ्रान्सच्या जमिनीवर नेपोलियनचा पाय अगदी शेवटचा असा लागला, त्या ठिकाणी, त्याच वेळी, त्याच्या कन्येने एक गुलाबाचे फूल ठेवून, निशाणी कायम केली होती. ते स्थळ पाहून तेथे काही वेळ थांबल्यावांचून मला राहवेना. त्या समयीं त्या थोर वीर पुरुषाची अप्रतिम उज्ज्वल कारकीर्द व अखेर त्याने फार दिवसांपासून मनांत बाळगलेल्या साऱ्या आशा व उमेदी एकदम पार ढासळून गेल्या, यांविषयी माझ्या मनांत विचार आले. तो सर्व मुखी थोर ह्मणून नावाजलेला असूनही मानवजातीच्या निसर्गसिद्ध मर्यादा व दैवाचा अस्थिरपणा त्याच्या लक्षात आला नाही. या त्याच्या वृथाभिमानाबद्दल मला त्याची फार कीव वाटली. साऱ्या युरोपखंडास एकसमयावच्छेदेंकरून लढण्यासाठी आव्हान करण्याचे त्याने मनांत आणले, त्यावेळी महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वास यामुळे तो किती तरी अंध झाला असला पाहिजे ! अखेर त्यांतच त्याला अपेश आले. निरनिराळ्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य हरण करण्याचा युगपत् प्रयत्न शेवटी फसलाच पाहिजे. तदनंतर सामर्थ्य, दृढनिश्चय आणि अलौकिक कर्तृत्वशक्ति यांनी युक्त अशा या महात्म्याच्या अंतःकरणांत अधिकाराविषयींची जी अनावर हांव वसत होती त्याज