पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुप्रसिद्ध, थोर व प्रतापशाली नेपोलियन याची मातृभूमि. तिच्या कन्येचे काही कपडे ठेवलेले आहेत. तिच्या निजण्याच्या खोलीमध्ये खुद्द तिच्या हातचे काही सुरेखसें काम ठेवलेले आहे. तेथें एक लहानसे पदार्थसंग्रहालय आहे. त्यांत मुख्यत्वे त्या शूरवीर शिपाईबहाद्दरासंबंधाच्याच वस्तु व स्मारके आहेत. तीही पाहण्यांत आली. खास नेपोलियनच्या खोल्या अगदी लहान, पण सोईवार व आरामाच्या आहेत. त्यांच्यांत त्याच्या प्रवासी पलंगाचा हुबेहूब नमुना व इतर सामान, त्यांतच प्रत्येक स्वारींत त्याच्या नेहमी बरोबर राहणारे त्याचे दिवाबत्तीचे यंत्रही आहे. त्याच्या बैठकीच्या खोलीत जोसेफाईनची शिवणकामाची पेटी आम्ही पाहिली. ती तिला राज्यारोहणाच्या प्रसंगी नजर मिळालेली असून, त्यांत इतर किरकोळ वस्तूंमध्येच तिच्या पतीची एक अगदी लहान व फारच सुरेख प्रतिमा होती. नेपोलियन एल्बा येथे असतांना त्याच्याजवळ असलेल्यापैकी काही सामान दसऱ्या एका खोलीत ठेवलेले आहे. त्याची कन्या हार्टेन्सी राहात असलेली खोलीही पाहून आम्ही जिन्यावरून उतरून बाहेर पडलो. नेपोलियन गडबडीने पळाला व शेवटी इंग्रजांच्या स्वाधीन झाला, तो येथूनच असे आह्मांला सांगण्यात आले. तो निघन गेल्यावर ब्लूचरच्या फौजेने येथे लुटालूट केली.पण पुढे क वर्षांनी बादशाहीण यूजेनी जी अद्यापि लंडनमध्ये तिवासांत राहात आहे, तिने त्या घरांतून नाहीशा झालेल्या