पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_माझा विलायतेचा प्रवास. माल्मेझाँ येथील इमारत मूळ एक इस्पितळ होतें. नेपोलियन हा फर्स्ट कान्सल नेमला गेल्यानंतर तेथे राहूं लागला. तेव्हां त्याने ती विकत घेऊन सामानसुमान मागवून सजविली. या छोटेखानी घरांत राहात असतांना गेलेला काळ, आपल्या साऱ्या आयुष्यात अत्यंत आनंदाचा व सुखाचा होता असे त्याने कबूल केल्याचे प्रसिद्ध आहे. नेपोलियन व जोसेफाईन या दोघांमध्येही सौंदर्यपरिज्ञान व त्याविषयी अतिशय आवड उपजतच होती. ती पुढे पूर्णावस्थेला गेली होती. या इमारतीची व्यवस्था व शंगार यांवरून याची उत्तम साक्ष पटते. जोसेफाईनचा अंत झाला तो येथेंच. ज्या बिछान्यावर तिचे प्राणोत्क्रमण झालें तो एका खोलीत ठेवलेला आहे. तोही आमीं पाहिला. ड्राइंग रूम (बैठकीची खोली ) मध्ये पारिसच्या नागरिकांनी नेपोलियनला नजर केलेला सुवर्णपात्रांचा सुंदर संच ठेवलेला आहे. त्याचा पुस्तकसंग्रहही जपून ठेवलेला आहे. तो पाहून मला भारी समाधान वाटले. येथील बिल्यर्ड रूम व इतर ड्राइंग रूमही आम्ही घाईघाईने पाहिल्या. त्या दुसऱ्या लहानच पण उत्तम श्रृंगारलेल्या दालनांना शोभेशाच आहेत. जोसेफाईनच्या दालनांत नक्षीदार पडदे लावून फार सुरेख आरास केलेली आहे. तेथील म्यूझिक रूम (गायनचादन–शाळा ) त्या दुदैर्वी मालकिणीच्या वेळी होती, तशीच सजविलेली कायम आहे. एका कोठडीमध्ये तिचे व