पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग चवथा. सुप्रसिद्ध, थोर व प्रतापशाली नेपोलियन याची मातृभूमि. आम्ही पारीसहून माल्मेझॉला जाण्याला निघालो. त्या दिवशी पारिसपासून सात मैलांवर ऐतिहासिकदृष्टया चिरसंस्मरणीय, सुंदर आणि रमणीय भागांतून जात असतांना रूएल नांवाच्या लहानशा खेड्यांतून गेलो. तेथें सुप्रसिद्ध कार्डिनल रिशेलोने बांधविलेलें मंदिर आहे. त्याच्यांत एम्प्रेस जोसेफाईन व तिची कन्या हार्टेन्स यांच्या कबरी आहेत, त्या आगीं पाहिल्या. पुढे दोन मैल गेल्यावर माल्मेझाँ या इमारतीमध्ये जोसेफाईन घटस्फोटानंतर राहात असे. अॅबट्कृत नेपोलियनचे चरित्र वाचीत असतांना जोसेफाईन ह्मणजे सुपत्नीत्वाची प्रत्यक्ष प्रतिमा अशी कल्पना माझ्या मनांत भरलेली होती. पुढे तिचे नेपोलियनशी लग्न लागण्यापूर्वीच्या व घटस्फोटानंतरच्या अशा खऱ्या व ऐतिहासिक हकीकतीचा परिचय झाला. तेव्हां तिच्याविषयींच्या या उदात्त कल्पना दुर्दैवाने नाहीशा झाल्या. ३५