पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. खाना ) एक अत्युत्कृष्ट व सुशोभित स्थळ आहे. तेथे पूर्वी चौदाव्या ल्यूई राजाचे सोन्याचे भरीव सिंहासन असल्याने तो त्या वेळी फार सुशोभित दिसत होता. ज्या राजशय्येवर त्या राजाचे प्राणोत्क्रमण झालें, ती शय्याही आह्मीं पाहिली.. या दालनांतील पडदे सर्व जगांतील अत्युत्तम व सुंदर अशा. पडद्यांपैकी आहेत. शेवटी आम्ही येथील मंदिर पाहिले. त्याच्या छतावर, अतिशयच उत्तम व भव्य असें, धि ग्लोरी आफ् गॉड् ( ईश-महिमा) नांवाचे चित्र काढलेले आहे. तें पुरे करण्याला कारागिराला अडीच वर्षे, उंच पराचीवर उताणे पडून, काम करावें लागले. अशा अवघड रीतीने काम करण्याच्या शिणामुळे. अखेर त्याला वेड लागले, ह्मणतात. या मंदिराचे दरवाजे ओक लांकडाचे असून, त्यांच्यावर अतिशय बारीक व चमत्कारिक नक्षी कोरलेली आहे. प्रेसिडेंटाची निवड होते त्या प्रसंगी येथे तन्निमित्त प्रार्थना होते. तिला हजर राहणे, हे अधिकारी या नात्याने त्याचे पहिले काम असते.