पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'फान्टेनब्लो' आणि 'व्हसेंलिस.' ‘बाबां आपल्या पतीकडे (सोळाव्या ल्यूई राजाकडे ) ज्या दरवाजांतून पळून गेली तो दरवाजा निळ्या व लाल रंगाच्या पुस्तकालयांत गेल्यावर आम्ही पाहिला. नंतर आझी मनोरम नाचाची खोली व आयने महाल पाहिले. सन १८७० साली प्रशियाचा राजा विल्यम जर्मनीचा पहिला विल्यम बादशहा झाल्याची द्वाही फिरली, ती या आयनेमहालांतूनच.. - चौदावा ल्यूई हा साऱ्या युरोपांत तत्कालीन अतिप्रबल व थोर राजा होता. त्याची दालने फारच सुंदर आहेत. त्यांच्या छतावर क्लासिकल (प्राचीन ग्रीक व रोमन) देवतांची भव्य व प्रेक्षणीय चित्रे काढलेली आहेत. त्यांच्यावरून त्या त्या दालनाला अपालो, मयूरी, डायाना, व्हीनस, मार्स, हयूंलीस अशी नांवे दिलेली आहेत. त्यांच्यांतील सजावट व आरास आणि सामानसुमान भव्य व मौल्यवान् आहे. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचे स्वातंत्र्य कबूल करग्याच्या तहावर ज्या दालनामध्ये सह्या झाल्या, तेथे पाय ठेवतांच त्या चिरस्मरणीय युद्धाचे व त्यांत फ्रेंच शिपायांनी दिलेल्या साहाय्याचे स्मरण झाले. तो तह ठरतांना अमेरिकेचा प्रतिनिधि फ्रांक्लिन बसत असे ती खुर्ची, हा राजवाडा पाहण्यास येणाऱ्यांना दाखवितात. दुसऱ्या एका दालनांतून, वॉर ऑफ स्पानिश सक्सेशन (स्पेनच्या गादीच्या वारशासंबंधी लढाई) जाहीर करण्यांत आली. थ्रोन् रूम ( सिंहासनाचा दिवाण