पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पोर्सिलेनचा (चीनीच्या कामाचा ) स्तंभ आहे. त्याच्यावर नेपोलियनच्या पराक्रमाची निदर्शक चित्रे काढलेली आहेत. तो पाहून फारच आनंद व कौतुक वाटते. तो त्याला त्याच्या' द्वितीय विवाहाच्या प्रसंगी नजर मिळाला होता. तेथें नेपोलिय-- नच्या सुप्रसिद्ध सेनाधिपतींच्याही तसबिरी आहेत. प्रत्येक दालनांतील छतावर तत्कालीन अप्रतिम चित्रकलानिपुणांच्या हातची. सुंदर चित्रकारी केलेली आहे. ____ लढायांचे चित्रमंदिर ( ग्यालरी ) हे एक या राजवाड्याचा प्रेक्षणीय भाग आहे. पूर्वी तेथें, दरबारांत हजर असणाऱ्या . राजपुरुषांसाठी बांधलेल्या सत्रा खोल्या होत्या. त्यांचा हल्ली हा एकच लांबसा दिवाणखाना बनविला आहे. फ्रान्सच्या इतिहासांतील अगदी प्राचीन काळापासून तो बऱ्याच अलीकडील काळापर्यंतच्या लढाया-नेपोलियनचे विजय सुद्धांयांची उत्तमोत्तम चित्रे येथे काढलेली आहेत. त्याच्या जवळच फ्रान्सच्या राण्यांची मौल्यवान् दालने आहेत. त्यांतीलच एकामध्ये एकोणीस राजपुत्रांचे जन्म झाले. या दालनांना अत्युत्तम कारागिरीच्या द्वारे उत्तम शोभा आणलेली आहे. त्यांच्या छतावर बिनमोल चित्रे काढलेली आहेत. बेफाम झालेल्या पारिसच्या लोकांनी बास्टील किल्ल्याचा व तुरुंगाचा पाडाव केला, आणि नंतर त्यांच्या झुंडीच्या झुंडी अतिशय चिथून येथे आल्या. त्यांचे शांतवन होण्यापूर्वी दुर्दैवी मेरी आंटायनेट राणी घाबां