पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'फान्टेनब्लो' आणि 'व्हर्सेलिस.' लागतो. सबब ते वर्षांतून एक दोन वेळच उडविले जातात. त्यांचा अद्वितीय मजेदार देखावा पाहण्याला लोकांचे थवेच्या थवे जमतात. सर्वांत मोठ्या कारंजाभोंवतीं फ्रान्स देशांतील प्रमुख नद्यांचे द्योतक ब्रांझ-पंचरसी-धातूचे पुतळे बसविलेले आहेत. या राजवाड्याच्या जागी प्रारंभी तेराव्या ल्यूई राजाची शिकार करण्याची लहानशी बंगली होती. त्याच्यामागून गादी-वर बसलेल्या राजाने हा महाल बांधला. त्याचा दर्शनी भाग साऱ्या पृथ्वीमध्ये अद्वितीय भव्य व भपकेदार आहे. आंतील भाग उत्तम प्रकारे शंगारलेला असून येथे ठेवलेले सामानसु. मानही अप्रतिम व मुबलक आहे. यामुळे तो कोणाही थोर -राजाला राहण्याला योग्य असा आहे. सुप्रसिद्ध राज्यक्रांतीच्या वेळी सोळाव्या ल्यूई राजाला--बहुतेक जबरदस्तीनेच–पारिसला नेले ते येथूनच. या सुखनिवासाला त्याचे पाय परतून लागले नाहीत. त्याच्यांतील ज्या ज्या दालनांत जे जे थोर राजपुरुष पूर्वी राहात होते, ती ती दालने व तेथील सामानसुमान व सजावट, जशीच्या तशी ठेवलेली आहे. हा राजवाडा नेपोलियनचा फारच आवडता होता. त्यानेच तेथील कांही भाग शंगारित केले, व तेथे उत्तमोत्तम सामान आणवून ठेवविले. त्याच्या खास दालनामध्ये तसबिरी ठेवलेल्या आहेत. त्या साऱ्या फ्रान्स देशामध्ये अप्रतिम आहेत. हा चित्रसंग्रह सर्व दुनियेतील अव्वल दर्जाच्या संग्रहांत मोडतो. तेथे एक