पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ___ या राजवाड्यांतील उत्तमोत्तम सामान, सुंदर चित्रे व अप्रतिम पडदे, यांच्याशिवाय येथे दुसरें कांहीं माझ्या मनांत भरले नाही. युरोपांत प्रत्येक ठिकाणी पूर्वकालीन दंतकथा, ऐतिहासिक परंपरा, वस्तु व गोष्टी, यांविषयीं जो विलक्षण आदर दिसून येतो, त्याचा माझ्या मनावर चांगलाच ठसा उमटल्याशिवाय राहिला नाही. आह्मां प्राच्य लोकांनाही या सर्व गोष्टी प्रेक्षणीय व मनोरम वाटतात; पण आमचा या प्रसंगाशी अधिक निकट संबंध असता तर आपल्या अंतःकरणांत जे मनोविकार उद्भवले असते, तितक्या उत्कटपणाने ते या ठिकाणी उत्पन्न झाले नाहीत. प्रेक्षणीय व सुरेख असें व्हर्सेलिस शहर समुद्राच्या सपाटीपासून ४५० फूट उंचीवर आहे. हवा स्वच्छ व निरभ्र असेल तेव्हां तेथून बारा मैलांवर असेलल्या पारिस शहरांतील काही इमारती व चकाकणारी शिखरें दृष्टीस पडतात. येथील राजवाडा बादशाही थाटाचा असून त्याचे सभोवार रमणीय बागा व पांच मैल प्राकाराचे उपवन आहे. जागजागी सुंदर व नामी पुतळे उभे केलेले आहेत. त्यांच्या योगाने तेथें भारी शोभा आलेली आहे. तेथील वृक्षराजींची व वनश्रीची शोभा व संपदा अवर्णनीय आहे. कांही झाडांना विलक्षण व त-हेत-हेचे आकार आणलेले आहेत. कारंजांसंबंधाने व्हर्सेलिसची प्रख्याति आहे. ते सुरू ठेवण्याला पुष्कळच खर्च