पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'फान्टेनब्लो' आणि 'व्हर्सेलिस.' व तें करणाऱ्यांची शाबास होय, असे वाटते. हे कापडी पडदे तयार करण्याचे काम भारी किचाट व थकविणारे आहे. तें दीड तासावर कोणीही सारखें करूं शकत नाही, असें ह्मणतात. एखादा सुंदर देखावा हुबेहूब रेखाटतांना रंगांत रंग बेमालूम मिळवून देण्याचे कामी दृष्टोत्पत्तीस येणारे कौशल्य अलौकिक आहे. हे पडद्याचे काम इतके सूक्ष्म, सुरेख व बेमालूम केलेले आहे की, कोठे कोठे तर तें रंगीत चित्रच आहे, असा भास होतो. आपला मुलगा रोमचा राजा याच्या नांवें पोपाने सारी राजकीय सत्ता सोपवून देऊन स्वतः त्या सत्तेच्या राजीनाम्यावर सही करण्याकरितां पोपाचें मन चांगले वळविता यावे ह्मणून नेपोलियननें पोपाला जवळ जवळ सहा महिनेपर्यंत ज्या दालनांत बहुतेक अंशी अटकेतच ठेवलेले होते, ती पाहून नेपोलियन त्या काळाच्या पुष्कळच पुढे होता असे मला वाटले. त्याने मनांत आणलेली गोष्ट तितक्यांतच घडावयाची नव्हती. पुढे पाउणशे वर्षांनी, इटाली देश एकवटला व त्याला राष्ट्रीयपणा आला तेव्हां, ' होली सी' ची किंवा पोपांची राजकीय सत्ता नष्ट केली गेली. शेवटी आमी एका ग्यालरी- । तून गेलो. ती पुष्कळ ऐतिहासिक देखावे दाखविणाऱ्या प्रकाशित चित्रफलकांनी सुशोभित केली होती. आह्मी जिन्याने त्या राजवाड्यांतून बाहेर पडलो. तेव्हां नेपोलियन एल्बाला / जाण्याला निघण्याचे वेळी त्याने आपल्या मर्जीतल्या गार्ड लोकांना जेथून निरोप दिला, ते स्थळ आम्हांला दाखविले गेले.