पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. एका मेजाला खोंच पडली, तें मेज व ती खोंचही आमीं पाहिली. हतभागी जोसेफाईनइनें आपल्या घटस्फोटासंबंधी वचनें ज्या कोठडीत उच्चारिली, ती खोली व नेपोलियनच्या वहिवाटीच्या इतर खोल्याही पाहण्यांत आल्या. त्याचा लहान मुलगा 'किंग आफ रोम' ( रोमचा बालराजा ) याचा पाळणा त्याच्या निजण्याच्या खोलीत होता. पांचव्या चार्लस राजाचा. पुस्तकालयाचा मोठा दिवाणखाना पाहून मी सुप्रसन्न झालों. त्याची व्यवस्था फारच काळजीपूर्वक ठेवली जात आहे. नंतर आम्ही नववा ल्यूई, दुसरा हेन्री, तेरावा ल्यूई, पहिला फ्रान्सिस, आणि चौदावा ल्यूई, या फ्रान्स देशच्या पूर्वीच्या राजांच्या खोल्या पाहिल्या. दुसऱ्या हेन्रीने 'बॉलरूम' (नाचाची जागा) बांधविली तेथून राजवाडा, बाग आणि अरण्य यांचा देखावा उत्तम दिसतो. तत्कालीन कलाकौशल्य व शिल्पकला, यांच्या प्रगतीची ही इमारत एक अति उत्तम व मनोहर उदाहरण आहे. याच दालनामध्ये दुसऱ्या हेन्री राजाच्या राखेच्या निरनिराळी आसने व पोषाख यांत काढलेल्या किती तरी तसबिरी होत्या, ह्मणे. चौदाव्या ल्यूई राजाची दालने त-हेदार व सुरेख अशा चित्रांनी चांगली सुशोभित केली आहेत. याशिवाय येथील उत्तमोत्तम चीनीचे काम, व भिंतीवर टांगलेले अप्रतिम नक्षीदार कापडी पडदे, पाहून आमांला फार आनंद झाला. या कामांत कारागिरांच्या कल्पकतेची कमाल झालेली दिसून येते..