पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

‘फान्टेनब्लो' आणि 'व्हर्सेलिस.' फार भव्य व प्रचंड होते, त्या काळाची आठवण झाली. फ्रेंच राष्ट्राचा 'प्रेसिडेंट ' ( प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्ष ) ही वारंवार येथे येऊन राहातो. यामुळे हल्लीच्या राज्यपद्धतीचा पूर्वीच्या राज्यपद्धतीशी संबंध जोडलेला पाहून कौतुक वाटते. शिवाय, 'रिपब्लिक' किंवा लोकसत्तात्मक राज्यपद्धतीसुद्धां, डामडौल, राजकीय वैभव व थाटमाट, यांच्या दीप्तीला भाळतात, या गोष्टीची सत्यता सिद्ध होते. या राजवाड्याचा पुढील भाग ( मोहोरा ) फारसा भव्य नाही. पण आंतील काम मात्र तत्कालीन सुधारणा व संपत्ती यांच्या द्वारें जितके सुरेख व सुखसाधक करितां येण्याजोगें होते, तितकें केलेले आहे. सर्व वस्तु व व्यवस्था उत्तम रीतीने जपून जशाच्या तशा ठेविलेल्या आहेत. येथे पाहण्याकरितां ठेवलेल्या स्मारक वस्तूंवरून या राष्ट्राच्या प्राचीन इतिहासक्रमाचे साग्र दिग्दर्शन सहज होऊ शकेल. तेथे असलेल्या वड्याळांपैकी प्रत्येक घड्याळ, आज इतकी वर्षे झाली तरी, बहुतेक फरक न पडतां बरोबर चालतें आहे, हे पाहून मला मोठे कौतुक वाटले. 'मेरी, कीन आफ दि स्कॉट्स' इचे 'डॉफिन'शी [ फ्रान्स देशाच्या युवराजाशी ] ज्या लहानशा देवालयांत लग्न लागले, ते मला दाखविण्यांत आले. तसेंच नेपोलियननें बादशाहतीच्या राजीनाम्यावर सही केल्यानंतर मेणबत्तीचे शामदान रागाने आपटल्यामुळे