पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. की, येथील वृक्ष फार मोठे असून येथील जनावरे पाळीव नाहीत. प्राचीनकाळी या अरण्यांत घोड्यांवर बसून सावजांच्या पाठीमागे लागून राजे लोक कशी मगया करीत असत याची कल्पना आह्मांला या ठिकाणी बरोबर करतां आली. या अरण्याच्या मध्यभागी एक प्रसिद्ध व मोठा ओक वृक्ष आहे. तो पहात आह्मी थोडा वेळ थांबलो. तो आज हजारापेक्षा अधिक वर्षे पंचमहाभूतांशी नेटाने टक्कर देत उभा आहे. पूर्वीपैकी त्याचा हा थोडासाच भाग उरलेला आहे. समोरच एक दुकान आहे. तेथून या वृक्षाच्या लांकडापासून तयार केलेल्या काही चिजा स्मारक ह्मणून विकत घेऊन आमी पुढे रवाना झालो. - फान्टेनब्लो शहर साऱ्या फ्रान्स देशांतील हवापाण्याच्या मानाने उत्कृष्ट गणलेल्या शहरांपैकी एक आहे. देशभर प्लेगचा सपाटा उडाला होता तेव्हां जी थोडींशी स्थळे त्याच्या सपाट्यांतून सुटली होती, त्यांपैकींच हैं एक होते. उन्हाळ्यांत राहण्याला ते फार चांगले, असें सारे लोक समजतात. याची साक्ष त्या दिवसांत तेथील नेहमींची १४००० ची लोकवस्ती दुपटीहून जास्त होते, यावरून पटते. येथील राजवाडा पाहून किती तरी गोष्टींचे स्मरण झाले. फार वर्षांपूर्वी येथे राजे लोक रहात असत. यावरून फ्रान्स देशांत राजसत्ता नांदत होती आणि तेथील राजे लोक व त्यांचे मंत्रिमंडळ यांचे राजवैभव