पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- 'फान्टेनब्लो' आणि 'व्हर्सेलिस.' पुष्कळ विद्वान् ग्रंथकार, कवि, तत्त्ववेत्ते, आणि कारागीर, अशा लोकांचे वास्तव्य असे. त्या खेड्यापासूनच आम्ही या विस्तीर्ण भूभागांत शिरलो. त्याचा विस्तार ४१९० एकर, व परिघ ५६ मैलांचा आहे.फ्रान्स देशांत पहिल्या प्रतीचें व अति उत्तम राखलेले जंगल असें हेच आहे, असें ह्मणतात तें यथार्थ वाटले.या अरण्यांत अजस्र शिला व खडक आढळतात. ते मूळचे येथील नसून, ज्वालामुखीच्या सपाट्याने, किंवा अतिप्राचीन काळी बर्फाचे 'ग्लेसियर्स किंवा प्रचंड लोट यांच्या बरोबर, वाहून येऊन पडलेले आहेत, हे ऐकून आह्मांला मोठेच आश्चर्य वाटले. येथे लहान झुडुपांचा अगदीच अभाव आहे, हा दुसरा एक चमत्कार पाहण्यात आला. हिंदुस्थानांत रस्त्यापासून ३०३५ कदमांवरील पदार्थ दिसण्याची मारामार असल्यामुळे, तसेंच खोल दया व उंच आणि पहातांच भोवळ आणणारे, डोंगर आणि झुडुपे यांच्या योगाने घोड्यावरून शिकार करणे अशक्य असते. परंतु फाँटेनब्लो येथील अरण्यांत याच्या अगदी उलट स्थिति आहे.येथे घोड्यावरून लांब पल्ल्याच्या शिकारी करण्यास कसलाही अडथळा येत नाही. (यासारखीच वुइंडसर व इंग्लंडांतील इतर शिकारीकरितां राखून ठेवलेल्या इतर जंगलांत स्थिति आढळते. ) फांटेन्व्लोचे अरण्य हे खरोखरी अरण्य नसून विशेष लक्ष न पुरविलेले उपवनच मटले तरी चालेल. उपवनांत व यांत फरक काय तो इतकाच २५