पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. • ण्याचे पूर्वी तो 'फांटेनब्लो' येथें माघार घेऊन दाखल झाला. . त्याचे पूर्वरात्री तो ज्या घरांत वस्तीला राहिला होता, तें घर आह्मांला दाखविण्यात आले. तें हल्ली एका सुप्रसिद्ध फ्रेंच ज्योतिर्विद् गृहस्थाच्या कबजांत आहे. अगदी पहिल्या प्रथमच्या ठिकाणी नवीन त-हेच्या विमानाने एक मैलाचा प्रवास आरंभींच केला गेला, ती जागा आह्मांला दाखविण्यांत आली. ___नांगराला घोडयाऐवजी बैल जुंपलेले इकडून जातांनाच · दृष्टीस पडले. हिंदुस्थानांत ही पद्धत आमच्या अतिशय पाठांतील आहे. परंतु यूरोपच्या पश्चिम भागांतून इंग्लंडकडे या पद्धतीचा अद्याप फैलाव झालेला नाही. हिंदुस्थानांत नांगराचें जूं बैलांच्या मानेवर ठेवतात. पण फान्टेनब्लो येथें तें त्यांच्या पुठ्याला बांधलेले होते,हा एक त्याच्यांत विशेष फरक दिसून आला. आमचा वाटाड्या फारच बुद्धिवान्केंब्रिज युनिव्हर्सिटीचा ग्राज्युएट-त्याला दुर्दैवामुळे हे काम करावें लागत होते त्याने सांगितले की, शेतकामाला बैलच अधिक उपयोगी पडतात. ही गोष्ट फ्रान्समध्ये आतां लोकांना पक्की अनुभवाला येऊ लागली आहे. फार वर्षांपूर्वी इकडे बैल पुष्कळ उपयोगांत आणीत. तेच पुनरपि आतां कामाला आणू लागले आहेत. NISTER फांटेनब्लो येथील अरण्याच्या सीमेवर आह्मी एका -लहानशा इतिहासप्रसिद्ध खेड्यामधून गेलो. पूर्वी तेथे