पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग तिसरा. 'फान्टेनब्लो' आणि ' व्हर्सेलिस दुसरे दिवशी आमची हिंदी वर्षप्रतिपदा होती. घर व जन्मभूमी यांपासून दूर होतो तरी, आमच्या त-हेची पक्कान्ने तयार करवून, तो वर्षप्रतिपदेचा सणाचा दिवस साजरा करण्याला आमांला अडचण पडली नाही. आमी मोटारमधून फान्टेनब्लोला गेलो. वाटेत फारच मजा वाटली. कारण, आह्मी ज्या प्रदेशांतून गेलों तो भाग फ्रेंच इतिहासातील अतिशय उत्साहजनक व अंतःकरण खळबळवून सोडणाऱ्या अनेक गोष्टींची आठवण ताजी करणारा असा होता. सफाईदार व सरळ राजमार्ग व त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षराजी पाहून आमांला सानंदाश्चर्य वाटले. तो थेट 'टूलोन' बंदरापर्यंत असाच उत्तम राखलेला आहे, असें आह्मांस सांगण्यात आले. इकडील रस्ते कोसोंगणती तीराप्रमाणे सरळ असतात. त्यांना सामान्यतः यत्किचित्सुद्धां वळण नसते, हे माझ्या येथे लक्षात आले. नेपोलियनचा लीपाझक येथे पराभव झाल्यानंतर राज्य सोड-. २३