पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. एक सुद्धां मोटार, मागणी येतांच विकत देण्याची कारखानदाराला सवड नसते. दोन दोन महिने आगाऊ सांगितलेला माल मिळण्यासाठी गि-हाइकाला तिष्ठावे लागते! हे ऐकून मला मोठा अचंबा वाटला. . दुसरे दिवशी आली पारिसला जाण्याला निघालो. सीन नदीच्या कांठाने जातांना सृष्टिसौंदर्याचे अप्रतिम मनोहर देखावे दृष्टीस पडत होते. काही अंतरावर 'फांटेनब्लो'चे रमणीय भूभाग व जंगल आह्मांला दृष्टिगोचर झाले. आणि चारी बाजूस दिसून येणारें हरित तण आझांला मनोहर व आल्हादजनक वाटले. त्याच दिवशी सायंकाळी आह्मी पारिसला पोहोंचलों व थेट जाऊन आपलें हॉटेल गांठले. २२