पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ्रान्सचा दक्षिण भाग. कारण, हिंदुस्थानांत हवें त्याला देशी कारखान्यांत जाऊन पाहतां येते. आलेल्या मंडळीला सर्व कारखाना दाखवून आणण्याची -मालकाला हौस वाटते, व तो कारखान्यासंबंधी गौप्याचा मुळी परिस्फोट होऊ न देतां कारखाना दाखवून आणितो. 'बुर्लेट मोटार वर्क्स' या कारखान्यांत, तेथील सभ्य व संभावित म्यानेजराबरोबर फिरून पहात मी बराच वेळ काढला. तो मला मोठ्या फायद्याचा वाटला. हा महत्त्वाचा धंदा किती लौकर वाढत आहे याची कल्पना पुढील गोष्टीवरून होईल. हा कारखाना सुरू होऊन सुमारें १३ वर्षे झाली. प्रारंभी दहाजण काम करीत होते. हल्ली ३००० लोक कामावर आहेत. तेथें प्रतिवर्षी ४००० मोटार -गाड्या नव्या बनवितात. साऱ्या फ्रान्स देशांत त्याचा नंबर दुसरा आहे. त्यांतील काम अगदी आतांपर्यंतच्या सर्व सुधारणांनी युक्त अशा रीतीने चालते. कामकरी लोकांचे आरोग्य कायम राहून त्यांना सुखाने काम करितां यावे, ह्मणून अनेक योजना केल्या आहेत. त्यांतच एक धुरळा झाडण्याचे खुबीदार यंत्रही कामी आणिलें आहे. मोटारगाडी तयार करण्याचे काम, निरनिराळ्या स्थितीत चाललेले, मी लक्षपूर्वक पाहिले. नंतर अगदी तयार झालेल्या काही उत्तमोत्तम गाड्याही मी पाहिल्या. त्या सर्व पुर्त्या तपासून नंतरच गि-हाइकाकडे पाठविण्यासाठी तयार ठेविल्या होत्या. तेथे त्यांची इतकी मागणी आहे की,