पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. दिसतो. निरभ्र हवेत, येथून सुमारे ९० मैलांवरचे माँट ब्लांक आणि आल्प्स पर्वत, यांची हिमाच्छादित शिखरे दिसतात, असे सांगतात. __येथील स्टॉक एक्स्चेंज-सराफकट्टा-ही इमारत सुरेख व प्रेक्षणीय आहे. तेथे विणकामाचें । म्यूझियम् । (पदार्थसंग्रहालय ) आहे. त्यांत त-हेत-हेचे व प्राचीन कपडे व कापड यांचा संग्रह आहे. त्यांतच उत्तमोत्तम भरजरी, व जरतारी. कापडांचे व साध्या, किनारी व गोटे यांचे नमुने, मध्ययुगांतील ‘पोपां'चे पोषाख, तेरावा, चौदावा व पंधरावा ल्यूई, या राजांनी वापरलेले कांहीं कपडे, सुरेखसे गालीचे, आणि ग्रीसमधील व इतर प्राचीन कबरींमध्ये सांपडलेल्या अवशिष्ट वस्तु, उत्तम व शाबूत स्थितीत असलेल्या, ठेविल्या आहेत. आधुनिक मागामध्ये कसकशी प्रगति व सुधारणा होऊन तो हल्लीच्या पूर्णावस्थेला पोहोंचला, तें स्पष्ट दाखविणारे मागांचे साठ नमुने येथे ठेविलेले आहेत, तेही आमी पाहिले. येथे एक धर्मार्थ विणकामाची शाळा आहे. ती व तेथील कामाचे नमूने मी गडबडीने पाहून आलो. तें काम पाहून मला फार समाधान वाटले. येथील एखादा रेशमाचा कारखाना पाहावा असें मनांत फार होते. पण ते जुळण्यासारखें नाही, असे कळले. खुद्द ब्रिटिश कान्सलकडूनही काही तजवीज करविता आली नाही. याचे मला भारी नवल वाटले.