पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ्रान्सचा दक्षिण भाग. जवळून वळणानें वहात जाणाऱ्या होन व सोन या नद्यांचा या शहराजवळच संगम झाला असल्याने शहराचा देखावा फार रमणीय दिसतो. लीयॉन्स येथे आमी जी प्रेक्षणीय स्थळे पाहिली त्या सर्वांत 'नाट् डेम' व 'फूरव्हायर टेकडीवरील मिनारा, ही आमांस फारच मजेची वाटली. त्याच्यावर आह्मी लिफ्ट रेलवेने चढलों. हे मंदिर फारच मोठे व भव्य आहे. सारे काम इटाली देशांतील संगमरवराचे आहे. ते बाहेरून विशाळ व भव्य दिसते. आंतील काम त्याहूनही उत्तम व सुरेख आहे. त्याच्यांत मुख्य मूर्ती व्हर्जिन मेरीची आहे. तिच्या डोळ्यांत बसविलेल्या हियांची किंमत साडेबावीस लाख रुपयांवर आहे, म्हणे. बैठ्या खांबांवर उभे केलेले सफेत संगमरवराचे पुतळे, रंगी बेरंगी नक्षीदार काम केलेल्या तावदानाच्या खिडक्या, आणि अप्रतिम चित्रकारी केलेल्या भिंती व छत, यांच्यामुळे ही पवित्र इमारत धार्मिकरीत्या भारी मोहक, भव्य व शोभिवंत झालेली आहे. त्याच्या जवळच एक लहानशी साधी इमारत आहे ती बाराव्या शतकांतली आहे म्हणतात. पण ती त्याहूनही पुष्कळ जुनी वाटते. तेथून सुमारे २०० पावलांवर टॉवर किंवा मिनारा आहे. ही इमारत लोखंडी असून चौकोनी पायावर उभारलेली आहे. तो मिनारा २५० फूट उंच आहे. त्याच्यावर जाण्याला पायऱ्या व लिफ्ट, दोन्ही आहेत. या मिनायावरून लीयान्स व आसपासचा प्रदेश, यांचा देखावा फार मनोहर