पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. कांहीं पडदे लंडन येथील जुन्या सेंट पॉलच्या देवळांतून येथे आणलेले आहेत. हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. रस्त्यावरील एका कारंज्यांत एक ऊन्ह पाण्याचा झरा आणून सोडलेला पाहून मला नवल वाटले. दुसऱ्या दिवशी आमी मार्सेलिस सोडून 'लीयॉन्स'ला जाण्यास निघालो. गाडीमध्ये गर्दी फार होती. तिच्यामुळे त्रास वाटला. पण आसपासचा सुंदर देखावा पाहण्यास सांपडल्याने तो पार भरून आला. मार्ग बहुतेक होन नदीच्या काठाकाठानेच असल्याने तो फारच रमणीय दिसत होता. पहाड, दऱ्या, खोरी, अतिशय सुरेख व हिरवीगार दिसत होती. पोपांची आपसांत भांडणे चालू होती, आणि फ्रान्स देशांत अराजक स्थिति सुरू झाली असतांना दरम्यानच्या काळांत पोपची राजधानी म्हणून सुप्रसिद्ध असलेले 'अव्हिग्नान' शहर मागे टाकल्यानंतर आम्हांला उत्तमोत्तम द्राक्षांच्या बागा लागल्या. या बागा जरी रम्य होत्या तथापि त्या पाहून,असली ही सुपीक जमीन, असे ऐषआरामाचे पदार्थ पैदा करण्याऐवजी, मनुष्यमात्राच्या जीवनाला अवश्य असे पदार्थ, उत्पन्न करण्याकडे लागती तर किती चांगले होते, असा माझ्या मनात विचार आला. लीयॉन्स येथे आह्मी दोनच दिवस राहिलो. तेथे तयार होणाऱ्या रेशमाच्या मालाविषयी हे शहर प्रसिद्ध आहे. तेथील लोकसंख्या व व्यापार पारिसच्या खालोखाल आहे. या शहरा