पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ्रान्सचा दक्षिण भाग. नाद, हे एका मागून एक दृष्टीस पडत व ऐकू येत गेल्याने, त्या •सर्वांचा माझ्या मनावर फारच नामी व कायमचा परिणाम झाला. 'ए. लि. प्राव्हेन्स' हे साऱ्या युरोपांत अति प्राचीन शहरांपैकी एक शहर आहे. त्यांतून जातांना मला ग्रीक, रोमन व गाल, या लोकांचे स्मरण झाले. फ्रान्स देशांत तीन निरनिराळी राज्ये होती, त्यावेळी हे एक राजधानीचे ठिकाण होते. पुष्कळशा प्रेक्षणीय स्थळांवरून त्याच्या गतवैभवाची अद्यापि साक्ष पटते. तेथील टौन हाल चौदाव्या शतकांत बांधलेला आहे. त्याच्यावरून आम्ही एका प्राचीन देवालयाच्या द्वाराशी पोहोचलो. यांतील काही भागांत मूळच्या एका जुन्या मूर्तिपूजकाचे मंदिर होते. त्यानंतरचे, यांतील काही भाग अगदी अलीकडील ह्मणजे अकराव्या शतकांतील व कांहीं चौदाव्या शतकांतील आहेत. दरवाजे ओक लांकडाचे आहेत. त्यांच्यावर नक्षीदार कोरीव काम फारच सुरेख केलेले आहे. तें कालगतीने बिघडू नये म्हणून विवक्षित प्रसंगांशिवाय ते नेहमी आच्छादिलेले असतात. हे मंदिर लहानसेंच आहे. पण त्याच्यांत बरीच सुरेख चित्रे आहेत. आंतील छतावरही फारच सुंदर नक्षीदार चित्रकलेचे प्रदर्शन झालेले आहे. पूर्वीच्या मूर्तिपूजकांच्या वेळच्या भागांत हल्ली ' बाप्टिस्ट्री' आहे. तिच्यामध्ये रोमन क्याथलिक धर्मातील सात 'साक्रेमेंट्स'ची प्रेक्षणीय चित्रे काढलेली आहेत. या मंदिरांतील