पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. जागजागी वळणावळणावर सृष्टिसौंदर्याचे नवे नवे प्रकार दिसून येत होते. हिंदुस्थानांत रूक्ष भाग फार. त्याच्या उलट इकडे जमिनीचा तुकडान् तुकडा लागवड केलेला , पहाड्यांचे उतार व बाजू टुमदार घरांनी अंकित झालेल्या, व प्रतिस्थळी हालचाल आणि सुखसमाधान निदर्शनास येत होते. त्यावरून पाश्चिमात्यांच्या सुधारणाविषयक कल्पनेचे पूर्ण स्वरूप जणों स्पष्ट दिसत होते. हिंदुस्थानांत नदीकाठी नेहमी दृष्टीस पडणारा देखावा मात्र इकडे पाहण्यांत येत नाही. पाण्याच्या घागरी घेऊन जाणाऱ्या बायका, पात्रांत गुरें धुतली जात असलेली, नदीत स्नाने उरकून संध्यावंदन व प्रार्थना करणारे आणि कांठावर पूजापाठ करीत असलेले लोक, यांपैकी काहींच आढळतः नाही. नदीकिनाऱ्यावर सर्वत्र सामसूम होते. हिंदुस्थानांतील नद्यांच्या कांठी नजरेस पडणारी हालचाल व गडबड यांच्या अगदी उलट वरील प्रकार होय. तरी फ्रान्स व इंग्लंडमध्ये मी निरनिराळ्या ठिकाणी प्रवास. केले, त्यांतील प्रत्येक वेळचा प्रवास विलक्षण मनोहर होता. हिरव्यागार व दाट तृणांकुरांनी आच्छादित भूभाग, चकचकीत नीलवर्ण समुद्र, घनदाट वृक्षवल्लींनी झांकून गेलेले पर्वत व पहाड, मरकत मण्यांनी गच्च भरल्यासारखीच जणों शोभणारी खोरी व दया, शांत खेडी आणि गजबजलेली शहरे, व तेथील मनाला मोहून टाकणारे नवे नवे देखावे आणि निरनिराळे