पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ्रान्सचा दक्षिण भाग. केलेले आहे. स्थंडिलावर त-हेत-हेचे पक्षी व दुसरी सुंदर नक्षी केलेली आहे. येथे दोन तांबडे दिवे सारखे जळत असतात. त्यांवरून मला आपल्याकडील देवालयांतल्या नंदादीपांचे स्मरण झाले. हे पवित्र स्थळ पाहून खाली आल्यावर, समुद्राच्या काठावरील प्रशस्त राजमार्गावर फेरा मारून आलो. या रस्त्यावर, समुद्रकांठी सुरेख बंगले बांधलेले आहेत. या रस्त्यावर फिरणे फार बहारीचे वाटते. येथील संपन्न गृहस्थांनी उन्हाळ्यांत येऊन राहण्याला, हे बंगले उपवनवाटिकांसारखे बांधलेले आहेत. दुसऱ्या दिवशी आह्मी 'रोकफरे' नावाच्या सुप्रसिद्ध पुलाजवळून गेलो. तो दोन पहाड्यांमध्ये एका कालव्यावर बांधलेला आहे. हे प्रचंड काम तिमजली आहे. प्रत्येक मजल्यांत सोळा सोळा कमानी आहेत. त्यांची लांबी ४५० फूट आणि एकंदर उंची २५० फूट आहे. शिल्पकलेचे हे एक अत्युत्तम व अप्रतिम विजयतोरणच होय. मला सृष्टिसौंदर्याची भारी आवड. त्यामुळे -या शहराबाहेरील आसपासचा देखावा मला मोठा मनोहर वाटला. युरोपाच्या पश्चिम भागांत हिरवीगार शेते आणि त्यांच्या सभोंवार असणारी कुंपणे यांची आमच्या नेत्रांना अद्यापि पुर्ती संवय झालेली नव्हती. किंचित् उंच सखल असलेली सपाट मैदाने यांचा तो चित्रविचत्र देखावा भारी आल्हादकारक होता. मार्सेलिसपासून तो थेट पारिसपर्यंतचा फ्रान्स देशाचा भाग आह्मांला खरोखर फार मोहक वाटला.