पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/359

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. यांच्यापेक्षा आपण किती तरी श्रेष्ठ आहों, असें ग्रेट ब्रिटननें स्पष्टपणे सिद्ध करून दाखविले आहे, आणि मी वर निदर्शित केलेले राज्यकारभाराचे धोरण त्याने नेटाने चालविले तर ग्रेट ब्रिटनचें नांव चिरकाल संस्मरणीय राहील. मलाया पेनिन्शुला आणि जावाची सफर केली, तिच्यावरून हिंदुस्थान आणि ब्रिटन यांचा जो हा राजकीय संबंध जडलेला आहे त्याचे महत्त्व किती आहे व राजकीय दृष्टया त्याचा खरा अर्थ काय आहे, याविषयीची माझी कल्पना व समजूत अधिक दृढ झाली होती. तसेच या हल्लींच्या सफरीचाही माझ्या मनावर पक्का ठसा उमटला आहे, आणि पूर्वीपेक्षाही अधिक स्पष्टपणे माझ्या निदर्शनास आले आहे की. आमच्या देशाची खरी उन्नती व कल्याण, वास्तविकपणे आमच्या स्वत:च्याच परिश्रमांवर अवलंबून आहे. मात्र आपल्या राज्यकर्त्यांनी आमची पिततुल्य काळजी वाहून आमच्या उन्नतीचा मार्ग आह्मांला दाखवून दिला पाहिजे. ही राष्ट्रीय उन्नती साध्य होण्याला, आमची प्रगती थोड्याशाच दिशांनी होऊन भागावयाचे नाही. ती सर्व दिशांनी चालली पाहिजे. त्या ध्येयभूत उन्नतीला पोहोचण्यासाठी, वरिष्ठ प्रतीचे शिक्षण प्राप्त होण्याची सामग्री संपादन करणे, हे केवळ पहिले पाऊल होय. सामाजिक व राजकीय प्रश्नांच्या बरोबरच, थोर व महत्त्वाच्या अशा आर्थिक, व्यापारसंबंधी, औद्योगिक, शिक्षणविषयक, आणि सार्वजनिक आरोग्यसंबंधाच्या, प्रश्नांशीही टक्कर मारली ३४२