पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंद आणि ब्रिटानिया. बुद्धीचे होते. त्यांनी शेकडो वर्षे परचक्राच्या अमलाखाली राहिल्यामुळे अज्ञानांधकारांत बुडून जाऊन स्वार्थकदृष्टी बनलेल्या अशा हिंदुस्थानांतील अनेक निरनिराळ्या झालेल्या संस्थानांचे एक स्वावलंबी व जोमदार हिंदी राष्ट्र तयार केले. या गोष्टीचे, तिकडील भावी पिढ्यांच्या लोकांना, निस्संशय स्मरण होईल. या थोर व उदारपणाच्या राजकीय धोरणाच्या उलट वर्तन करण्याचा प्रयत्न कोणी करीत असल्याचे कधीं मधीं ऐकू आले तरी, आपण हताश होऊ नये. कारण, माझ्या हिंदी देशबांधवांना मी हे खात्रीपूर्वक सांगून ठेवतों की, हे सारें राष्ट्र-राष्ट्रीय स्वरूपाने-या उच्च ध्येयाला बिलगलेले आहे, आणि ते, त्याला खास चिकटून राहील, त्याचा त्याग कधीही होऊ देणार नाही. या संबंधांतील ग्रेट ब्रिटनची वृत्ती नुसती तोंडापुरती सहानुभूती दाखविण्याची आहे असें नाही. या थोर हिंदी साम्राज्याची खरी प्रगती व भरभराट होत राहावी, अशा उत्कट इच्छेनें ब्रिटिश लोक प्रेरित आहेत. प्रसंगविशेषीं कितीही कुरकुर ऐकू येत असली तरी, हिंदुस्थानावरील ब्रिटिशांचा अंमल, पूर्वीपेक्षां आजकाल अधिक भक्कम पायावर उभा आहे. तेथील कोट्यावधी प्रजेची राजानष्ठा तशीच खरी व मनापासून आहे. कृतीवरून मनुष्याचे परिज्ञान होते. तशीच राष्ट्राची परीक्षा त्याच्या राजकीय कृत्यांवरून केली जाते. देश पादाक्रांत करून त्याच्यावर अमल चालविण्याच्या बाबतीत, रोम, पोर्तुगाल व स्पेन, ३४१