पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंद आणि ब्रिटानिया. पाहिजे. या सर्वांहूनही श्रेष्ठ व महत्त्वाची गोष्ट, आह्मीं दीर्घ उद्योगीपण व चिकाटी, यांच्या संवयी लावून घेतल्या पाहिजेत. आणि धैर्याचे परिशीलन करून आपल्या व्यवसायांत व्यापारविषयक सचोटी व राजकीय नीतिमत्ता हे गुण अंगी आणण्याची खटपट केली पाहिजे. आपल्या चारित्र्याची उन्नति व देशाभिमानाची अभिवृद्धि कली तरच, पुनरपि सुधारलेल्या जगाच्या आदरास पात्र होण्याची आपणास उमेद बाळगतां येईल. हे काम कष्टाचे व परिश्रमाचे आहे. त्याच्यासाठी सतत व दीर्घ प्रयत्न हवा आहे. ही ध्येय साध्य होण्यापूर्वी, अनेक शतकें निघून जातील. पण मला आमच्या राष्ट्राचा, तसेंच आह्मी ज्या विवक्षित मानवजातीच्या कुलांतले आहोत, त्यांच्या भावी उत्कर्षाच्या स्थितीविषयी पक्का भरंवसा आहे. कारण, या आमच्या मानवजातीच्या कुलाविषयी परमेश्वराला विशेष काळजी आहे, अशाविषयी आमां हिंदवासीयांना भरंवसा वाटतो माह. आहे. समाप्त. ३४३