पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मंडळीच्या स्वार्थसाधनासाठी व प्रजेला पिळून काढण्याच्या उद्देशाने चालवावयाची नसून, ती तेथील लोकांना फायदेशीर झाली पाहिजे, ही गोष्ट ते पूर्णपणे उमजून आहेत. ___ त्यांच्यातील सर्व प्रमुख व राज्यकार्यधुरंधर मंडळीला, या गोष्टीची जाणीव आहे. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासांत, त्याच्या मधील जोम कमी होऊ लागतो असा एक काळ अवश्य येतो. एखाद्या कुटुंबांतील कर्ता पुरुष आपल्या हातून त्या कुटुंबाची व्यवस्था नीटपणे चालण्याला लागणारी मेहेनत होणे अशक्य आहे, असे पाहून, पुत्राला शिक्षण देऊन तयार करितो, व आपल्याला मदत देऊन हळू हळू सर्व कुटुंबसंरक्षणाचा बोजा त्याच्या शिरावर देतां येईल, इतपत त्याला तयार करितो. त्याप्रमाणे, राष्ट्रालाही अशा काळासाठी पूर्वीपासूनच तरतूद करून ठेवावी लागते. हिंदुस्थानाच्या बाबतीत ब्रिटिश राष्ट्राची वृत्ती याच प्रकारची आहे, असें ह्मणता येईल. त्याची हीच इच्छा आहे की, कालवशात् हिंदुस्थानाला असा सुदिन प्राप्त होईल की, ग्रेट ब्रिटनच्या संरक्षक कृपाछत्राखाली स्वतःच्या हिंमतीवर देशाचा राज्यकारभार चालविण्याइतकी कार्यक्षमता त्या देशाच्या अंगी येऊन तो राज्यकारभाराच्या बाबतीत स्वावलंबी बनेल. आमचा ग्रेट ब्रिटनशी निरंतर संबंध राहात जाण्यावरच आमची भावी उन्नती अवलंबून आहे, हे मी अनेकवेळ प्रतिपादन केलेच आहे. ग्रेट ब्रिटनचे लोक फारच दयाशील व उदार ३४०