पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंद आणि ब्रिटानिया. ओढ ती हाणून पाडणे, हे होय. ही दुसरी तन्हा प्राचीन आर्य लोकांनी पादाक्रांत केलेल्या लोकांसंबंधी थोड्याबहुत प्रमाणाने अजमावून पाहिली होती. तिच्यात शेवटी त्यांना यश आलें नाही. दुर्दैवाने पुढे मागें ब्रिटिश लोकांच्या भुजबलाचा आधार नाहीसा झाला, आणि त्यावेळी हिंदुस्थानाला स्वतःच्या हिंमतीने व कर्तृत्वाने आपल्या पायावर उभे राहतां येण्याची योग्यता प्राप्त झाली नसली तर तो देश दुसऱ्या कोणत्या तरी परराष्ट्राच्या हाती पडेल, किंवा तो ज्या बेबंदशाहीच्या शोचनीय दुःस्थितीतून नुकताच वर आला आहे, तशा बेबंद स्थितीला पुनः पोहोचेल. पूर्वी रोमन लोक ब्रिटन सोडून निघून गेले तेव्हां, ब्रिटिश लोकांना याच प्रकाराचा अनुभव येऊन चुकला आहे. हल्लींच्या या बादशाही राष्ट्राच्या हाती आलेल्या या फार अंतरावर असलेल्या साम्राज्यांतील लोकांच्या संबंधाने, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची पाळी न येवो. सांप्रत परिस्थितीचा स्थूलमानाने विचार करतां हिंदुस्थानाला इतउत्तर फारच चांगली स्थिति यावयाची आहे, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. कारण, ब्रिटिश लोक स्वातंत्र्य व न्यायनीती, यांचे फार चहाते आहेत. हिंदुस्थानाला ते लोक, प्रभुसत्तेने आपल्या हाती सोंपली गेलेली ठेव, असे समजतात. तेव्हां तेथील राज्यकारभाराची व्यवस्था केवळ अधिकारी ३३९