पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग पंचविसावा. हिंद आणि ब्रिटानिया. युरोपांतील या सफरीमध्ये हिंदुस्थानासंबंधी निरनिराळ्या विषयांवर माझ्या मनांत आलेले प्रासंगिक विचार, मी येथवर नमूद केले आहेत. ते, इंग्लंड व हिंदुस्थान यांच्या परस्पर संबंधाविषयी ज्यांनी मननपूर्वक विचार केलेला नाही, अशा वाचकांच्या थोडेबहुत तरी उपयोगी पडतील. परमेश्वराच्या कृपेने व सुदैवाने हिंदुस्थानावर इंग्रजांचें प्रभुत्व आहे. हिंदी राष्ट्राच्या प्रगतीसंबंधाने सृष्टिनियमानुसार राजकारणाची दोन निरनिराळी धोरणे अमलात आणण्याजोगी आहेत. कारण जसे व्यक्तीला, तसेच राष्ट्रालाही, एकाच स्थितीत स्वस्थ व कायम राहतां येणे शक्य नाही. हिंदी लोकांना राज्यकारभारामध्ये अधिकाधिक भाग देऊन त्यांच्या अंगीं स्वावलंबन आणणे, हे प्रगतीचें एक धोरण. दुसरे, त्यांना नेहमीच धाकदपटशांत ठेवून, ब्रिटिश प्राबल्याचे मूलतत्त्व अशी जी त्यांच्यांत दिसून येणारी नैसर्गिक स्वातंत्र्याकडची ३३८