पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकमत. पक्षपात करितात, आणि प्रतिपक्षाच्या सभा वगैरे विषयींचा उल्लेख बुध्या सोडून देतात, किंवा त्यांच्यासंबंधी कुत्सितपणा दाखवितात. स्वपक्ष आणि स्वमत यांचे समर्थन करण्यासाठीच जणों ती आपली सर्व जागा राखून ठेवतात. जाहीर व्याख्यानाच्या हकीकतीमध्ये सुद्धां, बुध्द्या फेरफार करून, एडिटर साहेबांना न रुचणारा भाग गाळून, त्या हकीकती प्रसिद्ध करितात. याचा मला स्वतः अनुभव आलेला आहे. खरी वस्तुस्थिती किंवा सत्य, यांचा असा अपलाप किंवा विपर्यास होतो, यामुळे सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधाने, योग्य मत बनविण्याला, मोकळे व निर्मळ मन असलेल्या गृह. स्थाला फार कठीण जाते. परंतु सत्यापलाप करून लोकांच्या डोळ्यांत धूळ टाकण्याचा जो हा प्रयत्न असतो त्याचा पुष्कळ वेळां उलट परिणाम होतो आणि त्यामुळे वृत्तपत्रकारांचे उद्दिष्ट हेतू निष्फळ होतात. ३३७