पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकमत. त्यांना हाणून पाडण्यासाठी दुसऱ्या संस्था उभ्या करितात. या योगाने परस्परांमधील मतभेद व विरोध कळसाला पोहोचतो, व वाक्कलहाचे रण माजतें. पार्लमेंटांतील निवडणुकीच्या प्रसंगी तर लोकांमधील उत्साह व आवेश, यांना जास्त ऊत येतो. या निवडणुकीच्या वादांत पुष्कळ वेळां वाक्कलहावरून मारामारीपर्यंत मजल पोहोचते. त्याच्या पुढील पायरी सभेतील खुर्य्या, बाके वगैरे उलथून टाकणे ही असून शेवटी या निवडणुकीच्या युद्धाचे पर्यवसान म्हटले झणजे सभापीठ सर करून तेथून प्रतिपक्षाच्या वक्त्यास पिटाळून लावण्यांत होत असते. हे तंटे मिटविण्यासाठी पोलीसांना सुद्धा कधी कधी जावें लागते. पूर्वीच्या होमरूल बिलाच्या चळवळीसंबंधाने असा एक ध्यानात ठेवण्याजोगा प्रसंग घडून आला होता. बर्मिंगह्याम येथील 'टौन हॉल' मध्ये मिस्तर लायड जॉर्ज हे हामरूल बिलासंबंधाने मुख्य भाषण करणार होते. त्यावेळी प्रतिपक्षाने दंगा करून, तेथील खिडक्या फोडल्या, व आंतील जिनसांची नासधूस केली. मिस्तर लॉयड जॉर्ज यांना आगीचा बब चालविणाऱ्याचा वेश घेऊन, तेथून निसटून जावे लागले हात ! अशांतली अलीकडची उदाहरणे 'सफ्रेजेट्ट'-आडदांड मताभिलाषी स्त्रिया-यांच्या सभांसंबंधाची आहेत. स्त्रियांना मत देण्याचा हक्क मिळविण्यासाठी, या आडदांड बायांनी, आततायापणा व नासधूस करण्याचा उपक्रम केला आहे. या त्यांच्या चळवळीकडे पार्लमेंटने दुर्लक्ष केल्यामुळे, त्या त्रासून ३३५