पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लोकसमाजांतील पुष्कळच लोक, सामाजिक कामाविषयी उदासीन आढळतात. हे झणणे बरेंच विरोधाभासाचे दिसेल. असे मला सांगण्यांत आले की स्थानिक निवडणुकीमध्ये, फार तर एक-तृतीयांश मतदार, मते नोंदविण्याला पुढे येतात. आणि त्यांतील पुष्कळांना मते मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची नांवें सुद्धा सांगता येत नाहीत. खेडेगांवांतील लोकसमाज लहानसाच असावयाचा. त्याचे लोकमत प्रथमतः गप्पागोष्टींमध्ये, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या साहजिक भेटीमध्ये, व बोलण्याचालण्यामध्ये, तयार होते. त्या खेड्यांमधून सुद्धां सार्वजनिक सभागृहे असतातच. त्यांच्यांतच पुढे आपआपसांतच भाषणे ऐकण्याला लोक जमतात. पण ते केवळ राजी नाराजी दर्शवितात. याशिवाय व्याख्यानाकडे किंवा नंतरच्या वादविवादामध्ये ते मुळीच लक्ष देत नाहीत. या सभा भरविण्याला, प्राथमिक शाळांच्या इमारती सुद्धा उपयोगांत आणितात. सामाजिक हिताहितासंबंधी लोकांमध्ये चळवळ उत्पन्न होण्याची व्यवस्था एकाच जागी निबद्ध न राहतां, ती एकदम देशभर फैलावते. निरनिराळे स्थानिक अधिकारी, पाळीपाळीने लोकमताचे शिक्षण देण्याकरितां व त्याचा विकास होण्यासाठी मुख्य मुख्य ठिकाणी व्याख्याने देत राहतात. शिवाय निरनिराळ्या चळवळींच्या समर्थनासाठी संघटित संस्था तयार होतात. त्यांच्या विरुद्ध मताला असलेली मंडळी ३३४