पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकमत. ते त्याविषयी उदासीन असतात, किंवा आपल्या आवडीच्या वर्तमानपत्रामध्ये लिहून आलेल्या अथवा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रमुख मंडळीने प्रगट केलेल्या मतांचा, पोपटाप्रमाणे अनुवाद करून, समाधान मानीत असतात. पुर्ता व गहन विचार केल्याशिवायच अशा लोकांनी दिलेले लोकमत हितपरिणामी होणे, फारसे शक्य नाही, हे सहज समजून येईल. अशा प्रकारचे लोकमत, गळ्यांत घाट बांधलेल्या म्होरक्या मेंढ्याच्या मागून धावणाऱ्या मेंढराच्या कळपाच्या मताच्या तोडीचेच असणार. लोकसमाजाची स्थिती कमी जास्ती मेंढराच्या कळपा- सारखी असेल त्या मानाने लोकमत हा शब्द, उणा अधिक .. वैय्यर्थिकच होणार. लोकमतानुरूप चालणाऱ्या राज्यकारभारपद्धतींत-विशेषतः स्थानिक व म्युनिसिपल कामामध्ये इंग्लंडाची प्रगती, बहुतेक पूर्णतेला पोहोचलेली आहे. त्याअर्थी लोकांनी वेळोवेळी निकालासाठी पुढे येणाऱ्या सामाजिक प्रश्नांची योग्य माहिती करून पण्यास झटावं आणि सुजाण व पथ्यकर लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न करावा, हे अगदी अवश्य आहे. लोकसमाज लहानसा असेल तेथें, त्याच्या कारभारामध्ये, लोकमताला अनुसरून व्यवस्था ठेवली जाण्यास उत्तम संधी असते. चारासाठी पुढे येणाऱ्या प्रश्नांमध्ये, प्रत्येकाचा थोडा बहुत हत सबध असतो. सबब प्रत्येकजण योग्य विचार करूनच मत कायम करील, असा अधिक संभव असतो. असें आहे तरी, ३३३ २२