पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. निर्दिष्ट केलेल्या काही थोड्या नियमित बाबतींशिवाय प्रागतिक लोकांना जनरूढीचे उलंघन करण्यापासून परावृत्त करण्याइतके त्राण राहिलेले नाही. उलट इंग्लंडांमध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटेल तसे वर्तन करण्याची हवी तितकी मुभा आहे. तरी, तेथील लोकांमध्ये समाजाच्या ठराविक रूढीचे उल्लंघन करणारी अशी एखादी नवी तन्हा स्वीकारून, आपल्याकडे बोट दाखविले जाण्याची स्थिती उत्पन्न करून घेण्याइतके धीट गृहस्थ क्वचितच आढळतील. इंग्लिश लोक मोठे बहुजनसत्तावादी आहेत, अशी प्रसिद्धी आहे. माझ्या मते ही प्रसिद्धी इतक्याच पुर्ती खरी दिसते की, त्यांना सामान्यतः चालू रूढी बाहेर किंवा विरुद्ध गोष्ट, सहसा खपत नाही. त्यांच्या चालीरीती बहुजनसत्तावादित्वाला अनुरूप आहेत व त्या कायम राखण्याची त्यांची तन्हा गतानुगतिकतेची आहे. लोकांच्या हेटाळणीला पात्र होण्याजोगी कोणचीही गोष्ट करण्याला ते नेहमी मागेपुढे पाहतात. पण एकदां का ते नवीन क्रमाला लागले, की ते. त्याच्या मागें उत्सुकतेने जाण्यांत बिलकुल कसूर करीत नाहीत. पुष्कळसे इंग्रज लोक सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांचा बारकाईने विचार करीत नाहीत. याचे मला आश्चर्य वाटले. ते स्वतःचे अन्नवस्त्र कमविण्यामध्ये अगदी निमग्न झालेले असतात, अगर सार्वजनिक प्रश्नांची त्यांना पुरी माहिती नसते, अथवा ३३२