पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. येतो. त्याचा आह्मांला प्रसंगविशेषीं परिचय आहे, नाहीं असें नाही. तरी पण आमच्याकडे बुटांची चाल नसल्याने, ही निरंतरची टपटप चमत्कारिक वाटते. दुसरा एक नवीन प्रकार पाहण्यांत आला. शहरांतील मुख्य रस्त्यांतून घोडे जोडलेले मोठमोठे गाडे व त्यांच्यावर लादलेली पर्वतप्राय ओझी ! कांहीं गाड्यांना तीन, चार, सहा घोडे हारीने जोडलेले होते. प्राच्य देशांत घोड्यांऐवजी बैल जोडतात. कारण, तिकडील जमीन व हवापाणी यांना तेच सोईवार आहेत. साऱ्या फ्रान्स देशांत लोकसंख्येच्या मानाने मार्सेलिस शहर तिसरे, व बंदर या नात्याने पहिले आहे. ते मूळ फिनिशियन लोकांनी वसविलें. सुएझचा कालवा चालू झाल्यापासून त्याचे महत्त्व पुष्कळच वाढले आहे. पहिल्या दिवशी आम्ही हैड्रालिक लिफ्टस्-पाण्याच्या दाबाने वर चढविले जाणार मोठे पाळणे-मध्ये बसून 'नाटू डाम डिला गार्ड' च्या मंदिराला गेलो. हे मंदिर लहानच असून उंच पहाडीवर उत्कृष्ट स्थळी बांधलेले आहे. तेथून शहर, बंदर व आसपासच्या पहाड्या, यांचा देखावा फारच सुरेख दिसतो. या देवळांच्यावर व्हर्जिन् मेरी-मरियम्मा-ची मूर्ती आहे. ती ५० फूट उंच आहे. तिला सोन्याचा मुलामा केलेला आहे. त्यामुळे हे मंदिर आसपासच्या साऱ्या प्रदेशांत एक मुख्य व नाक्याचे स्थळ दिसते. आंत कांहीं जागी चित्रविचित्र व सुरेख जडावाचे काम ( मोझेइक्)