पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग चोविसावा. लोकमत. 'जरी कोणास स्वतःच्या मर्जीविरुद्ध एखाद्या गोष्टीस संमति द्यावी लागली, तथापि त्यामुळे त्याच्या नेहमींच्या मतांत फेरवदल होत नाही.' बटलर. हिंदुस्थानामध्ये जातिभेद तीव्र असल्याने तेथे लोकमत फार प्रबल असते, अशी काही मंडळींची समजूत झालेली दिसते. पण ती खरी नाही. खानपान व विवाह, यांच्या संबंधाच्या रूढी व नियम, कोणी उघड उघड मोडणार नाही तोवर, त्याला जनसमाजाकडून शासन झाल्याशिवाय, व्यवहारांतील हवी ती गोष्ट मनमानेल तशी करता येते, जनरूढीविरुद्ध साधारणसें वर्तन असले तर, त्याच्याविषयी टीका सुरू होऊन, कचित् प्रसंगी नापसंतीही दाखविली जाते. पण त्याच्यासाठी बहिष्काररूपी शिक्षा सहसा अमलांत आणली जात नाही. जातिभेदविषयक संस्था, बहुतेक जीर्ण च अश्मसारभूत किंवा प्रेतवतशी झालेली आहे. तिच्या अंगीं वर ३३१