पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/346

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्वजनिक हिताची खाती. प्रवासांची साधनें, सारीच प्रचंड. उपवनें व बागबगीचे, यांचीही तन्हा हीच. इतक्या मोठ्या, चांगल्या, सुशोभित लावलेल्या व राखलेल्या, सार्वजनिक बागा हिंदुस्थानांत क्वचितच दृष्टीस पडतात. विलायतेंत कोणतीच गोष्ट यःकश्चित् किंवा लहान प्रमाणावर करण्यात येत नाही. अशी तेथील श्रीमंती व चैन प्रमुख व स्पष्ट दिसते. तसेच तेथील दारिद्य सुद्धा अत्यंत तीव्र व दूरवर फैलावलेले आहे. हे म्हणणे उपरोधिक तरी पण खरे आहे. खरोखर येथे संपत्ती आणि दारिद्र्य जणों हातात हात धरून चालताहेत. साऱ्या पृथ्वीवरील अत्यंत समृद्ध व. विस्तीर्ण, अशा या शहरांतील अतिशय शोभिवंत व थाटदार राजमार्गा.. मागेंच, अत्यंत कंगाल व घाणेरड्या गल्ल्या व घरे आहेत. इकडे म्हण आहे की, 'देश-मोकळा प्रदेश-परमेश्वराने निर्माण केला व माणसांनी शहरे वसविली.' तिचे रहस्य वर लिहिलेल्या विलक्षण विरोधावरून स्पष्ट होते. देश सुपीक व त्याच्यांत पदा झालेली माणसें उद्योगी आणि साहसी. स्त्रिया व पुरुष दोघेही फारच मेहनती. तेव्हां त्यांनी हातांत घेतलेल्या प्रत्येक वस्तुमात्राची अभिवृद्धि तात्काळ होते. या भव्य प्रमाणाला बाध असा निसर्गदेवतेच्या महत्तर सृष्टीमध्ये तेवढा पर्वत व मोठमोठ्या नद्या यांचा. या मानाने पाहतां इकडील नद्या व पर्वत बेताचेच आहेत. स्कॉटलैंड देशांत मात्र भव्य पर्वत व. ३२९