पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायेतचा प्रवास. इंग्लिशमध्ये तर्जुमा होऊन, ते परत इंग्लंडाला आले; आणि पुनः ते मूळच्या पत्त्यावर मालकाला पोहोंचविले गेले. अशी त्याची व्यवस्था लागली होती. युरोपांत-त्यांतही इंग्लंडामध्ये प्रत्येक गोष्ट हिंदुस्थानांतल्या पेक्षां पुष्कळच मोठ्या प्रमाणावर आढळते. तेथील स्त्रिया व पुरुष अधिक धिप्पाड व सशक्त. तीच स्थिति खेळल्याफिरत्या मुलामुलींची व नित्य नेमाने चिमुकल्या गाडीतून हवा खाण्यासाठी फिरवीत जात असलेल्या अर्भकांचीही आहे. घोडे, गाड्या, गाड्यांत भरलेली ओझी हिंदुस्थानांतील वाहनांच्या मानाने अजस्र दिसतात. गुरेढोरें, बकरी, डुकरें, कोंबडी बदकें, सुद्धा तशीच. झाडेही सामान्यतः मोठी, डौलदार, प्रमाणशीर, चांगलीं जतन केलेली व फारच मनोरम दिसतात. भाज्या व फळे सुद्धां हिंदुस्थानांतील बाजारांतल्या पेक्षां पुष्कळच मोठमोठी असतात. शहरें, रस्ते, सार्वजनिक इमारती, दुकानें, करमणुकीच्या जागा, सुद्धां मोठ्या प्रमाणाच्या बाबतीत कमी असतात असे नाही. गिरण्या, कारखाने, उद्योगशाळा, व्यापारधंद्याच्या जागा, सर्व कांहीं, तिकडे एशियाखंडांत वर्षानुवर्ष दृष्टीस पडणार नाहीत, इतक्या भव्य व मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या आहेत. आगगाड्या व त्यांची इंजिनें, आगबोटी व इतर ३२८