पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लक्षात घेण्यासारखी आहे. स्त्री डाक्तर व दाया शाळेत जाऊन तपासणी करितात. तेथे रोग व घामटपणाचा शोध काढून, पुढे त्यांचा विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये पत्ता लावतात, आणि शाळा व घरे रोगांपासून मुक्त करण्याची, हरत-हेनें खटपट करितात. एकंदरीत, सुशिक्षित आणि ज्ञानसंपन्न लोकांच्या हातून चालविलेल्या आरोग्यसरक्षक व्यवस्थेमुळे, मृत्युसंख्या पुष्कळच कमी झाली आहे, इतकेच नव्हे, तर आयुर्दायाचे मानही पुष्कळच वाढले आहे. दीर्घायुष्यप्राप्ती हेच प्रत्येक प्राण्याचे अंतिम साध्य होय. इंग्लंडांतील टपाल व तारायंत्र खात्यांतील व्यवस्था फारच आश्चर्यकारक आहे. मोठी शहरे व गांव यांच्यामध्ये दररोज कितीदा तरी टपाल वांटले जाते. आगगाड्यांची रहदारी भारी मोठी व जलद आहे. त्यामुळे जागजागी टपाल तेव्हांच पोहोचू शकते. हिंदुस्थानांतील टपाल व तारखातें जी उत्तम कामगीरी बजावीत आहे, ती आमच्या परिपाठांतली आहे. तिच्यापेक्षाही ते येथे इंग्लंडांत, वरचढ रीतीने काम देते आहे. आमच्या देशांत या खात्याने करून दिलेल्या सोईपैकी, एक दोनींची इकडे उणीव दिसून येते. ती मुख्यत्वे 'मनी आर्डर व 'व्ह्याल्यू पेएबल सिस्टिम'ची होय. इकडे 'मनी आर्डरी' व 'पोस्टल आर्डरी' विकत मिळतात, हे खरे. तरी हिंदुस्थानांत ' मनी आर्डरी'च्या पद्धतीमुळे देवघेवीच्या कामी ३२६ सार्वजनिक हिताची खाती. जी सोय आहे, तिची इकडे उणीव वाटते. 'व्हाल्युपेएबल'च्या द्वारे व्यापाऱ्यांना गि-हाइकाकडे मालाची लहान लहान पार्सलें पाठवितां येतात ती त्यांची किंमत वसूल केल्यावरच, पोस्ट आफिसांतून गिहाकांना मिळतात. अर्थात नगदीने मालाची विक्री करण्याला त्यांतही लहानशा प्रमाणावर ही त हा फारच उपयोगी व सोईची आहे. ती इकडे सुरू नाही याचे मला आश्चर्य वाटते. पोस्टाचे अधिकारी त्याविषयी उत्सुक नाहीत किंवा जनतेची सेवा करण्यांत ते कुचराई करितात, असेही नाही. पण हे काम त्या खात्याने हाती घेतले तर, मध्यम स्थितीतील व्यापारी व अडत्ये, यांचे नुकसान होण्याचा संभव असल्याने, लोकमत विरुद्ध होईल, यामुळेच. ही तन्हा कदाचित् अमलांत आणिली गेली नसेल. - या खात्याची सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता व साधनसमृद्धी अजमाऊन पाहण्याकरितां आह्मीं एक पत्र व लखोट्यावरील पत्ता ही हिंदुस्थानांतील एका भाषेत लिहून, ते तिकडे राहणाऱ्या एका गृहस्थाच्या नांवें धाडले. त्या पत्राचे काय होते ते पाहण्याची आम्ही मोठ्या जिज्ञासेने वाट पहात होतो. बरेच दिवस झाले तस, त पत्र रद्दी कागदाच्या टोपल्यांत गेले, असें आह्मी समजलों. पुढे एका सुरेखश। सुप्रभाती तें पत्र उशीरां, तरी पण मालकाला पोहोंचविले गेले असल्याचे आम्हांला कळून आले. तें प्रथम हिंदस्थानांत गेलें; तेथे त्याच्यावरील पत्त्याचा, ३२७ समजलो. पुढे एका जविले गेले अनात्याच्यावरील "