पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मी लंडन येथे पाहिली. तिचा सर्व लोक उपयोग करून घेतातच. शिवाय शाळेतील मुलांनाही तेथे पोहोण्याला शिकवितात, याचा मला आनंद वाटला. बहुतेक स्नानगृहांजवळच धुण्याच्या जागाही असतात तेथे बायकांना धुणी धुतां येतात. मोठ्या शहरांमध्ये घराचे भाडे जबर यामुळे सर्व गरीब कुटुंबांना सोईवार घरे घेतां येत नाहीत. एखाद्या लहानशा कोठडीतच राहावें लागते. पण अशा संकुचित व कुंद जागेत धुणी धुण्याची फार गैरसोय असल्याने ती या सार्वजनिक धुण्याच्या जागांनी नाहीशी होते. शहरांतील प्रत्येक घरामध्ये केरकचरा सांठविण्यासाठी केराची टोपली ठेवावी लागते. ती आठवड्यांतून एकदां, सार्वजनिक अधिकाऱ्यांनी नेमलेले झाडणारे लोक, रिकामी करितात. केरकचरा, पृथक् बांधलेल्या भट्ट्यांमध्ये जाळतात, किंवा त्याची दुसरी काही तरी व्यवस्था लावतात. सार्वजनिक हिताची खाती. पाण्याचा पुरवठा, बहुतेक हिंदुस्थानांतल्याप्रमाणेच विहिरीपासून घेतात. तोच मोठ्याशा गांवांत, नद्या किंवा सरोवरें यांच्यांतून नळाने आणतात. पाणी उपयोगात आणण्यापूर्वी मोठमोठ्या फिल्टरबेड्स मधून गाळून घेतात. अलीकडे बऱ्याच वर्षांपासून आरोग्यरक्षणसंबंधी तजविजी अमलांत आल्या आहेत. त्यांच्यामुळे रोग पुष्कळच कमी झाले आहेत. इंग्लंडांत ज्वराचे मान अगदीच संपुष्टांत आले आहे. देवीच्या सांथी बहुतेक नष्टप्राय झाल्या आहेत. या बाबतीत देवी टोचण्याच्या प्रघातामुळेही थोडीथोडकी कामगिरी घडून आली आहे, असें नाहीं. घाणपाण्याची व्यवस्था लावणे, हेही आरोग्यरक्षणाचे एक अवश्य अंग आहे. प्रत्येक गांवामध्ये घाणपाण्याच्या गटाराची सोय केलेली असते. त्या गटारांमध्ये घरोघरच्या मोऱ्या सोडलेल्या असतात, व अशा प्रकारे वापराचे पाणी व घाण, गांवाबाहेर दूर नेऊन सोडतात. तेथें विशिष्ट क्रियेच्या द्वारे त्याचे खत तयार केले जाते व त्याचा उपयोग शेतकीच्या समृद्धीसाठी करण्यांत येतो. अथवा हे घाणपाणी ओहोटीच्या हद्दीपलीकडे समुद्रांत बंबाने फेंकून देतात. खेड्यापाड्यांतील ३२४ आजवरच्या प्रयत्नांमुळे झालेली प्रगती, या एकाच गोष्टीचरून लक्षात येण्याजोगी आहे की, लंडन शहरामध्ये मृत्युसंख्येचे प्रमाण एका पिढीच्या अवधीतच पूर्वीपेक्षां तीन-दंशाशाने कमी झालेले आहे. सांथीच्या देवीप्रमाणेच 'टायफस् ' ज्वर बहुतेक नाहीसा झाला आहे. गोवर व क्षयरोग यांचे रोगी एक-तृतीयांशाने कमी झाले आहेत. स्थानिक आरोग्य-संरक्षक अधिकारी, तसेच त्यांमध्ये प्रमुख, 'लंडन कौंटी कौन्सिल,' रोगांचा मागमूस लागेल तेथे त्याचा बीमोड करण्यासाठी, सारखे दक्षतेने झटत असतात. यासंबंधी खबरदारी घेतली जाते त्यांत, शाळेतील विद्यार्थ्यांची विशेषतः त्यांचे दांत व डोळे, यांची-डाक्तराकडून तपासणी करविली जाते, ती ३२५