पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्वजनिक हिताची खाती. माझा विलायतेचा प्रवास. आरोग्यरक्षणाची मूळ आधारभूत साधनें होत. त्यांच्या अभावी स्थानिक आरोग्यरक्षक अधिकाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने जुळवून अमलांत आणिलेल्या आरोग्यरक्षणाच्या योजना साऱ्या व्यर्थ होतात. उलट एकाद्याचा वर्तनक्रम कोणच्याही तन्हेनें नांव ठेवण्याजोगा नसूनही, घाणपाणी अगर त्याचा अव्यवस्थित निकास यांच्यामुळे, त्याला विषाराची बाधा होऊ शकेल. ह्मणून सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणाची तजवीज करणे स्थानिक आरोग्यरक्षक अंमलदारांना किती महत्त्वाचे आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. हुकूम माजिस्ट्रेट देऊ शकतो. ते विकणाऱ्या दुकानदारावर किंवा जिन्नसांच्या मालकावरही यानंतर खटला करून त्याला त्यापायीं जबर दंडाची शिक्षा देवविता येते. त्याने पुनः तोच अपराध केल्याचे सिद्ध झाले तर, त्याला कैदेची शिक्षा देतात. खाण्यापिण्याच्या पदार्थात भेसळ करणे, या गुन्ह्याची व्यवस्था 'फूड अँड ड्रग्स् आक्ट ' खाली लागते. त्या अन्वयें, सनिटरी इन्स्पेक्टराला, हव्या त्या दुकानांत जाऊन, दूध, लोणी वगैरे खाण्याचे पदार्थ तपासणीसाठी विकत घेतां येतात. असे पदार्थ विकत घेऊन, त्याचे तीन भाग करून, त्यांच्यावर मोहरा करावयाच्या व एक मोहोरबंद भाग दुकानदारापाशी, दुसरा स्वतः जवळ ठेवून, तिसरा तपासणीसाठी सरकारी पृथक्करण करणाऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवावयाचा असतो. तपासणीअंती तो भेसळ झालेला सिद्ध झाला तर, विकणारावर खटला होऊन, त्याला जबर दंड होतो. ____ या गोष्टी इंग्लंडांत फारच कसोशीनें व तपशीलवार रीतीने अमलांत येतात. हिंदुस्थानांत याचे होईल तितकें अधिक अनुकरण होणे अवश्य व फायदेशीर होईल. इकडे सार्वजनिक आरोग्यरक्षणसंबंधी कायदा अमलांत आहे. त्या अन्वये 'सनिटरी इन्स्पेक्टर्स ' नेमण्याचा अधिकार, स्थानिक अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे. वाटेल तेव्हां घरांच्या मोया तपासणे व आपल्या हद्दीतील खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवणे, ही कामे, त्या इन्स्पेक्टराकडे असतात. विक्रीस ठेवलेलें मांस, मासे, दूध, फळे, वगैरे पदार्थ दूषित. आढळले तर ते एकदम जप्त करून माजिस्ट्रेटाकडे चौकशीसाठी पाठवून देण्याचा त्यांना अधिकार असतो, आणि योग्य वाटल्यास जप्त केलेल्या जिन्नसांचा नाश करून टाकण्याचा ३२२ स्वच्छपणा, हा केवळ व्यक्तीसंबंधाचाच प्रश्न नसून सार्वजनिक आहे. गरीब लोकांच्या घरांमध्ये स्वतंत्र स्नानगृहाची सोय नसते. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्नानगृहे बांधून दिलेली असतात. तेथे थोडीशी फी घेऊन, स्नान करण्याची सोय. स्थानिक अधिकाऱ्यांना करून देता येते. पुष्कळशा गांवांतन अशा स्नानगृहांशिवाय, सार्वजनिक पोहण्याच्या सोईही असतात, हे माझ्या पाहण्यांत आले. अशी एक पोहोण्याची जागा,