पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग तेविसावा. सार्वजनिक हिताची खाती. 'सर्वांत मुख्य संपत्ती आरोग्य.' इमर्सन. ज्ञानाचा प्रसार होत चालला त्याच्याबरोबरच आरोग्यरक्षण हे सर्व लोकांना अधिकाधिक महत्त्वाचे व कळकळीचें काम झाले आहे. पूर्वी सांथीचे रोग अनिवार्य व नैसर्गिक होणारे समजले जात असत आणि त्यांपासून बरीचशी प्राणहानि झाली तथापि त्यांचे शमन करण्याचे उपाय फारच कमी योजण्यांत येत. दूषितांशी संसर्ग घडल्याने असा संसर्ग उपासमाराच्या व अशक्तपणाच्या स्थितीत जास्त बाधण्याचा संभव असतो. आरोग्यशास्त्राच्या नियमांचे अतिक्रमण झाल्याने, घाणीचा किंवा घाणपाण्याचा पुर्ता निकास नसल्याने किंवा तो प्रतिबद्ध असल्याने, आणि रोगजनक परिस्थितीने दूषित असलेल्या घरांत राहिल्याने, सांथीचे रोग जडतात, ही गोष्ट . आतां सर्वविश्रुत झालेली आहे. स्वतः स्वच्छतेकडे पूर्णपणे लक्ष देणे, आणि खाण्यापिण्याचा योग्य बंदोबस्त राखणे, ही दोन ३२१